पेट्रोल, डिझेल दरात घट



मुंबई (दि.06) : सलग दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यांनंतर गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. गुरुवारी देशभरात पेट्रोल 8 ते 1 0 पैसे आणि डिझेल 12 ते 13 पैशांनी स्वस्त झाले.

खनिज तेलाच्या किंमतींमधील घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन कपातीचा सपाटा कायम ठेवला आहे. आजच्या दर कपातीनंतर मुंबईत पेट्रोल 78.55 रुपयांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी मुंबईत पेट्रोलचा दर 78.69 रुपये होता. डिझेलचा दर 69.09 रुपये झाले असून त्यात 13 पैशांची घट झाली.नवी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना 72.89 रुपये मोजावे लागत असून डिझेलचा दर 65.92 रुपये आहे. दिल्लीत स्थानिक कर कमी असल्याने इतर राज्यांच्या तुलनेत येथे पेट्रोल आणि डिझेल दर कमी आहेत. कोलकात्यात पेट्रोल 75. 57 रुपये आणि डिझेल 68.29 रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोल दर 75.73 रुपये आणि डिझेल 69.63 रुपये आहे.

गुडगावमध्ये पेट्रोल 72.82 रुपये असून डिझेल 65.10 रुपये आहे. कंपन्यांच्या दर कपातीने 12 जानेवारीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. 12 जानेवारीपासून कंपन्यांकडून दर कपात करण्यात आल्याने पेट्रोल 3 रुपये 05 पैसे आणि डिझेल 3 रुपये 20 पैशांनी स्वस्त झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post