लक्ष्मीच्या पालवांनी वाजतगाजत आली ‘परी‘...


लेकीचे धुमधडाक्यात स्वागत करून चव्हाण कुटुंबीयांनी दिला ‘मुलगी वाचवा’चा संदेश

नगर (दि.07) : गुलाबपुष्पांनी सजविलेली चारचाकी वाहन आणि त्यात बसुन आलेली ‘परी‘ चे स्वागत नागपुर येथील चव्हाण कुटुंबियांनी मोठ्या धुमधड्याकेत केले. चारचाकी वाहनापुढे स्वागतासाठी सनई चौघडा त्याच बरोबर बॅण्ड पथकाचे मंगल सूर वाजत त्या लहान परीचे स्वागत करण्यात आले. मंगलमय वातावरणात नवनागापूर येथील चव्हाण कुटुंबीयांनी आपली नवजात लेक ‘परी’ चे स्वागत केले. या आगळ्या वेगळ्या स्वागताने सर्वच आश्‍चर्यचकीत झाले होते. मात्र, चव्हाण कुटुंबियांनी एक संदेशच या परीच्या स्वागतामधुन समाजाला दिला आहे.

चव्हाण यांनी या माध्यमातून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’चा संदेशही देऊन मुलींच्याही जन्माचे स्वागत आपण करु शकतो तसेच मुलाांच्या बरोबरीने आज मुली समाजात उभ्या आहेत. नवनागापूरच्या गजानन कॉलनी परिसरातील रहिवासी उद्योजक विशाल सुभाष चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले.  कुटुंबात आलेल्या चिमुकल्रा परीने सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. मुलगा - मुलगी समानतेच्या महत्त्व उमजलेल्या चव्हाण कुटुंबीयांनी या माध्यमातून ‘मुलगी वाचवा’चा संदेश देण्याचे ठरविले.


त्यानुसार (गुरुवारी ) सायंकाळच्या सुमारास सौ. दिव्या विशाल चव्हाण या माहेरहून परीला घेऊन नवनागापूरला दाखल झाल्या असता चव्हाण कुटुंबीयांनी परीला नववधूप्रमाणे वाजतगाजत घरी आणले. डॉ. डोंगरे कॉम्प्लेक्स चौकात जीपची विविधरंगी फुलांनी सजावट करण्यात आली. पुढच्या बाजूला पुष्पांनी वेढलेल्या आकर्षक टोपलीत परीला अलगद ठेवण्यात आले. बॅण्डपथकाचे मंगल सूर वाजवत सुमारे अर्धा किलोमीटर परीला वाजतगाजत घरी आणण्यात आले. यादरम्यान रस्त्यात पुत्रजन्माप्रमाणे पेढे वाटून सर्वांना या आनंदात सहभागी करून घेण्यात आले. परीचे दारात औक्षण केल्यानंतर नववधूप्रमाणे माप ओलांडून तिचा गृहप्रवेश करण्यात आला. त्यासाठी घरात फुलांच्या पायघड्याही अंथरण्यात आल्या होत्याअशी माहिती संजय चव्हाण (मो.9822112363 यांनी दिली आहे.


सध्याच्या काळात मुलगा- मुलगी भेदभावाची पारंपरिक मानसिकता दूर सारून मुलीला मुलाप्रमाणेच सांभाळण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. चव्हाण कुटुंबीयांनी लेकीचे केलेले अनोखे स्वागत परिसरात कौतुकाचा विषय बनले आहे. या स्वागत मिरवणुकीत उद्योजक सुभाष माधवराव चव्हाण, सौ. सुनीता सुभाष चव्हाण, संजय माधवराव चव्हाण, सौ. हेमा संजय चव्हाण, परीचे वडील विशाल सुभाष चव्हाण, आई सौ. दिव्या विशाल चव्हाण, नीलेश सुभाष चव्हाण, सौ. प्रिया नीलेश चव्हाण, अनिकेत संजय चव्हाण, सौ. तृप्ती अनिकेत चव्हाण, चि. ॠषिकेश संजय चव्हाण, चि. अनुज विशाल चव्हाण, चि. आयुष नीलेश चव्हाण, चि. हर्षवर्धन नीलेश चव्हाण आदी चव्हाण कुटुंबातील सदस्यांसह नवनागापूरच्या सरपंच सौ. सुशीलाताई जगताप, नगरसेविका सौ. कमल दत्तात्रय सप्रे, माजी नगरसेवक दत्तात्रय सप्रे, नंदकुमार कटारिया, चंद्रभान डोंगरे, अर्जुन सोनवणे, अशोक सप्रे, देशमुख गुरुजी, जयंत बेरड, बाळासाहेब सप्रे, रूपेश सातपुते, शिवाजी सदरे, अमोल सूर्यवंशी, कल्याण जाधव, अंकुश अनारसे, सचिन कोल्हे, अविनाश दाणी, संतोष नाबगे, दिलीप भंडारी, अक्षय मेहेत्रे, अभिजीत मेहेत्रे, नितीन कांबळे, सचिन कोकाटे, बाळासाहेब बाविस्कर, अनिकेत बनसोडे, अक्षय पिसे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post