कॅश व्हॅनमधून 5 लाख चोरले व्हॅन चालकाविरूद्ध गुन्हा



नगर (दि.05) : एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनमधून व्हॅनच्या चालकाने पाच लाख रूपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 4) दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात व्हॅन चालक नितीन पोपट दरंदले (वय- 45 रा. हिंगणगाव ता. नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओरिएंटल बँकेच्या सावेडी येथील एटीएममध्ये मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास किरण मच्छिंद्र गायकवाड (रा. भिस्तबाग) हे कॅश व्हॅनमध्ये 53 लाख रूपये रक्कम घेऊन आले होते. या व्हॅनवर दरंदले चालक होता.

गायकवाड एटीएममध्ये कॅश भरत असताना चालक दरंदले याने व्हॅनमधून पाच लाख चोरून नेले. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पिंगळे करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post