कळसूबाई शिखर अहिल्या शिवप्रेमी फॅमिली ट्रेकिंग ग्रुपने केला सर
शिखर परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारतचा संदेश
नगर (दि.05) : मनात धडकी भरवणारा महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळख असलेल्या कळसूबाई शिखर अहिल्या शिवप्रेमी फॅमिली ट्रेकिंग ग्रुपने सर करुन शिखरावर चढाई करताना परिसरात स्वच्छता अभियान राबविले. महिला पुरुषांसह 30 सदस्यांचा सहभाग असलेल्या या ग्रुप मधील अवघ्या 4 वर्षाची काव्या मराठे या चिमुकलीने स्वत: कळसूबाई सर केला.
नगर (दि.05) : मनात धडकी भरवणारा महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळख असलेल्या कळसूबाई शिखर अहिल्या शिवप्रेमी फॅमिली ट्रेकिंग ग्रुपने सर करुन शिखरावर चढाई करताना परिसरात स्वच्छता अभियान राबविले. महिला पुरुषांसह 30 सदस्यांचा सहभाग असलेल्या या ग्रुप मधील अवघ्या 4 वर्षाची काव्या मराठे या चिमुकलीने स्वत: कळसूबाई सर केला.
समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंचीवर असलेले कळसूबाई शिखर सर करण्यासाठी अहमदनगर मधील शिवप्रेमी फॅमिली ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य अकोला तालुक्यातील (जि.अहमदनगर) बारीगावात आले. प्रारंभी कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी ट्रेकर्सनी स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार केला. वय वर्षे 4 पासून ते 68 वर्षा पर्यंतच्या 30 महिला पुरुष सदस्यांचा सहभाग असलेल्या या ग्रुपने पहाटे 4 वाजता बॅटरीच्या सहाय्याने शिखरावर चढाई सुरु केली. शिखर सर करीत असताना सदस्यांनी परिसरात पडलेले प्लॅस्टिक पिशव्या, बॉटल आदी साहित्य उचलून परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारतचा संदेश दिला. हवेतील अल्हाददायक थंडावा, शिखरावर वाहणारे जोरदार वार्याचा अनुभव घेत ट्रेकिंग सुरु होती.
अवघड टप्पे पार करीत साडे तीन तासाच्या ट्रेकिंगच्या थरारानंतर ट्रेकिंगचा सुर्योदयाच्या वेळी ग्रुपचे सदस्य शिखरावर पोहचले. भारत माती की जयचा गजर करीत सदस्यांनी तिरंगा फडकवला. कळसूबाई वरुन दिसणारे सुर्योदयाचे विलोभनीय दृश्य, डोळ्यात भरणारे सह्याद्रीच्या पर्वत रागां, अलंग, मदन, कुलंग, रतनगड, किल्ले व भंडार दर्याचा विस्तीर्ण जलाशयाच्या दृश्यांनी ट्रेकर्सच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सदस्यांनी जमा केलेल्या कचर्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. ग्रुपचे संस्थापक इंजी. श्रीरंग राहिंज यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी ट्रेकिंग करण्यात आली. ग्रुपची ही कळसूबाई सर करण्याची तीसरी वेळ होती.
या ग्रुप मध्ये डॉ.भास्कर जाधव, डॉ.किरण लोंढे, डॉ.वसंत खंडागळे, रेल्वे विभागातील बाळासाहेब थोरात, जालिंदर वाल्हेकर, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्रा.सुखदेव वडतीके, इंजी. गिरीश धोत्रे, रमेश वराडे, शशांक गोरे, अरुण घोडके, सुदाम ढेमरे, राजेंद्र येळीकर, स्नेहल दगडे, स्वाती ठाकूर, मोनिका वाघे, सोनाली वाघे, प्रियंका भागवत आदी महिला, पुरुष, युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. 4 वर्षाच्या काव्या मराठे या चिमुकलीने हा कळसुबाई सर केल्याचा विश्वास बसत नव्हता.
Tags:
Maharashtra