जिल्ह्यामधील 35 गावांमध्ये दुषित पाणी
बाराशे ठिकाणचे पाणवठे दूषित, कर्जत आघाडीवर
नगर (दि.09) : जिल्ह्यातील चौदा तालुक्यांतील पाण्याचे 1305 नमुने तपासण्यात आले असून यामध्ये 35 गावांतील सुमारे 63 नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोगय प्रयोगशाळा व वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सवेक्षण यांच्यावतीने जिल्हयातील सुमारे 1305 पाणी नमुने तपासण्यात आले असुन, त्यात 35 गावांमधील पाणी नमुने दुषित असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील महिन्यात केलेल्या तपासणीमध्ये 63 नमुने दुषित असल्याची बाब अहवालावरुन समोर आली आहे. दर महिन्याला जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले जातात. या वर्षात मागील महिनाअखेरपर्यंत 20 हजार 382 नमुने तपासण्यात आले. त्यातील 1125 नमुने दूषित असल्याचा अहवाल आला आहे. कर्जतमधील एकूण नऊ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. त्याखालोखाल संगमनेर व श्रीरामपूर, पारनेर तालुक्यांतील चार गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.
शेवगाव, जामखेड व नेवासे या तीन तालुक्यांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले नाहीत. ज्या ठिकाणी पाणी दुषित नमुने आढले आहेत त्या गावामध्ये उपया योजना करण्याच्या सुचना आता देण्यात आल्या आहेत.
दूषित पाणी असलेली गावे
पारनेर : रुईछत्रपती, अळकुटी, खडकवाडी, वासुंदे.
अकोले : लाडगाव, आंबेवंगण, टिटवी.
नगर : चास, टाकळी काझी, देवगाव.
संगमनेर : कौठेकमळेश्वर, घुलेवाडी, लोहारे, मिरपूर.
पाथर्डी : निपाणी जळगाव.
राहुरी : बारागाव नांदूर, टाकळीमियाँ.
श्रीगोंदे : कोळगाव.
कोपरगाव : गोधेगाव, बोलकी, संवत्सर.
कर्जत: बजरंगवाडी, वालवड, कारेगाव, पिंपळवाडी, पोटरे वस्ती, कोंभळी, थेरगाव, निमगाव गांगर्डा.
राहाता : तिसगाव मोठेबाबानगर, एकरुखे, बोरावके वस्ती.
श्रीरामपूर : भोकर, खिर्डी, गुजरवाडी, टाकळीभान.
शेवगाव, जामखेड व नेवासे निरंक
शेवगाव, जामखेड व नेवासे या तीन तालुक्यांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले नाहीत. यामध्ये शेवगावमध्ये 44, जामखेडमधील 74, तर राहात्यातील 63 पाणीनमुने घेण्यात आले होते. या तिन्ही तालुक्यांतून एकही नमुना दूषित आढळून आलेला नाही. ज्या ठिकाणी दुषित पाण्याचे नमुने आढळले आहेत त्या ठिकाणी उपाय योजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
Tags:
Maharashtra