विधान परिषदेच्या 24 जागा रिक्त होणार
मुंबई (दि.05) : विधान परिषदेच्या 24 जागा येत्या पाच महिन्यांत रिक्त होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच इच्छुकांनी लॉबिंग सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणाची समीकरणे पार बदलून गेली असल्याने अनेकांना आता सत्तेपासून दुर रहावे लागणार आहे. तसेच विधान परिषदेसाठी गुप्त मतदान होणार असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यताही वाढली आहे. भाजपाची मेघा भरती झाल्यानंतर अनेकजनांना त्याचा फटका बसला आहे. यातच आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लगाले अहो.
विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून गेलेल्या 9 सदस्यांची मुदत येत्या दि.24 एप्रिलला संपणार आहे. काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या प्रत्येकी तीन, तर शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्हे यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाच्या भेटीगाठी घेऊन विधान परिषदेसाठी आपला दावा सांगायला सुरुवात केली आहे.
सत्तांतरानंतर राज्यातील राजकारणाची गणिते साफ बदलून गेली आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितरीत्या या निवडणुकांत उतरणार असल्याने भाजपाला अपक्ष तसेच मित्रपक्षांच्या सहाय्याने निवडणूक लढवावी लागणार आहे.
पुढील पाच वर्षात होणार्या विविध निवडणुकीतही सत्ताधार्यांच्या पारड्यात अधिकच्या जागा पडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. पाच वर्षात होणार्या रिक्त जागांवरील अन्य निवडणुकांमध्ये जुलै आणि ऑगस्ट 2020 : 6 जागा, औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था, औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक मनतदार संघाच्या जागांसाठी निवडणूक होईल. येत्या 24 एप्रिल 2020 ला 9 जागांसाटी विधानसभा सदस्यातून निवडून द्यावयाच्या जागांची निवडणूक होईल. यात काँग्रेसच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेस 3, भाजपा 2 तर शिवसेनेच्या 1 जागेचा समावेश आहे.
जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त होणार्यां 15 जागा आहेत. स्थानिक प्राधिकारी संस्था - मुंबई महापालिका 2, सोलापूर, कोल्हापूर,धुळे नंदूरबार, अकोला बुलढाणा, अहमदनगर, नागपूर, ठाणे, जळगाव, सातारा-सांगली, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया स्थानिक संस्थांमधून प्रत्येकी 1 जागा त्यानंतर विधानसभा सदस्यातून निवडून द्यावयाच्या जागा 10 जागांपैकी भाजपच्या 6, राष्ट्रवादी काँग्रेस दोन तर शिवसेनेच्या 2 जागांचा समावेश आहे. शिक्षक मतदारसंघ च्या 3 जागांमध्ये औरंगाबाद, नागपूर आणि कोकणातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. तर अमरावती आणि नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या 2 जागांची निवडणूक होईल.
Tags:
Maharashtra