नगर (दि.08) : विविध देशातील व राज्यामधील सहकारी पतसंस्था विषय कायदे सहकारी पतसंस्थेची कार्यपध्दती या विषयावर चर्चा करण्यासाठी तसेच विविध राज्यात व विवधि देशात असलेल्या सहकारी पतसंस्थांचे कायदे व कार्यपध्दती याचा अभ्यास करुन आदशृ पतसंस्थांचे कायदे व कार्यपध्दती याचा अभ्यास करुन आदशृ कायदे व आदर्श कार्यपध्दती संपूर्ण जगात एकाच पध्दतीने कशी राबवता येईल. याबबत विचार विनिमय करण्यासाठी शिर्डी येथे शनिवार दि.15 फेबु्रवारी सकाळी 9 वाजता आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे.या आंतराष्ट्रीय सहकार परिषदेत थायलंड, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका तसेच कर्नाटक, गुजराथ, गोवा, मध्यप्रदेश आदी ठिकाणवरुन मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य सहकारी पतसंस्थत्त फेडरेशनचे काका कोयटे यांनी दिली आहे.
जिल्हा उपनिबंध दिग्विजय आहेर म्हणाले, या आंतराष्ट्रीय सहकार संवाद मेळाव्याचे उद्घाटन राज्य सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील, उर्जा व उच्च शिक्षण मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडीट युनियनचे अध्यक्ष रणजित हेत्तीयाराची व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इलेनिता सँड्रॉक तसेच राज्याचे सहाकर आयुक्त अनिल कवडे, अप्पर निंबंधक डॉ.पी.ए.खडांगळे,उपनिंबंधक मिलिंद सोबले, नाशिक विभागीय सहनिबंधक श्रीमती ज्योती लाटकर, राज्यातील सहकार खात्याच्या विविध पदावर कार्यरत असलेले अधिकारी व पतसंस्था चळवळीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कोयटे म्हणाले की, राज्य फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय को-ऑर्डीनेटर अॅड सौ.अंजलीताई पाटील, चेअरमन स्वामी स्वरुपानंद पतसंस्था रत्नागिरीचे दीपक पटवर्धन, मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा अर्बनचे डॉ.मुकेश झवंर, बँकिग तज्ज्ञ गणेश निमकर म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय संवाद कार्यक्रमात विविध देशातील विविध राज्यातील सहकारी पतसंस्था विषयक कायदे, सहकारी पतसंस्थेची कार्यपध्दती या विषयावर चर्चा होणार आहे. विविध राज्यात व विविध देशात असलेल्या सहकारी पतसस्थांचे कायदे व कार्यपध्दती याचा अभ्यास करुन आदर्श कायदे व आदर्श कार्यपध्दती संपुर्ण जगात एकाच पध्दतीने कशी राबवता येईल याबाबत विचार विनिमय होणार आहे.
या आंतराष्ट्रीय सहकारी परिषदेस आंतराष्ट्रीय स्थरावरील सहाकरी पतसंस्था संघटना असलेल्या असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ युनियनचे अध्यक्ष रणजित हत्तीयाराची, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इलेमिता सँड्राँक या उपस्थित राहणार असल्याने या परिषदेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्रातील सहकार खात्यच्या विविध पदावर कार्यरत असलेले अधिकारी व पतसंस्था चळवळीतील प्रमुख पदाधिकारी या अंतरराष्ट्रीय सहकार परिषदेस उपस्थित राहणार आहे. या परिषदेचे माध्यमातून तयार झालेली कि नोटस् याच दिवशी दुपारी होणार्या राज्यव्यापी सहकार मेळावा प्रसीं सहकार मंत्री ना. शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील यांना सादर केली जाणार आहे.
Tags:
Maharashtra