राज्यात 100 युनिट मोफत वीज देण्यावर विचार : उर्जामंत्री नितीन राऊत


राज्यात 100 युनिट मोफत वीज देण्यावर विचार : तीन महिन्यात निर्णय : उर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई  (दि.08) :  सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय महाविकास आघाडी घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात 100 युनिट पर्यंत वीज वापरणा-या मोफत वीज देता येईल का? यावर विचार सरकार करत आहे. यासाठी तीन महिन्याचा कालावधी विभागाला देण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर यावर विचार केला जाणार असल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अशा पद्धतीने मोफत वीज देता येईल का याची पडताळणी करण्यात येत आहे. महावितरण आणि उर्जा खात्यावरील बोजा कमी करणे, लिकेज बंद करणे, वसुली आहे त्याचे निकष तयार करणे जेणेकरून त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही याबाबत विचार सुरु आहे. आर्थिकस्थिती सुधारणे, उत्पादन खर्च सर्वात कमी करणे, वीज दर कमी करणे या सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच यावर निर्णय घेणार असल्याचे उर्जामंत्री म्हणाले. एकीकडे वीज नियामक आयोग वीज वाढीचा प्रस्ताव देत असताना वीज मोफत देणे कसे शक्य आहे, असे विचारले असता उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, ते प्रस्ताव पाठवत असतात ते त्यांचे काम आहे. मात्र सर्व बाबी पडताळल्यानंतरच याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे राऊत म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post